PCMC Budget : ‘बजेट फेब्रुवारीत मांडणार, नव्या प्रकल्पांऐवजी प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यावर भर’

एमपीसी न्यूज –  लोकसहभाग, महिला केंद्रीत अर्थसंकल्पात प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. नव्या योजना, प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी (PCMC Budget) सध्या सुरु असलेली कामे वेगाने मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जाईल. फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प स्थायी समिती आणि महासभेपुढे सादर करण्याची औपचारीकता पूर्ण करु, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी आज (सोमवारी) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2022-23 चा सुधारीत आणि सन 2023-24 चा मुळ अर्थसंकल्प ई – बजेट प्रणालीमधुन तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. लेखा विभागाकडे सादर केलेल्या आकडेवारीची योग्य छाननी व दुरूस्ती करून वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे. अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ भारत योजनांचा समावेश आहे.

Pimpri News : पीसीसीओई मध्ये मंगळवारी अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन

शहरातील वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन वाहनतळांची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी पार्किंग सुविधा वाढ व ट्राफिक समस्येवर उपाययोजना, नागरिकांना चांगल्या पायाभूत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिजाऊ क्लिनिक्सची निर्मिती, मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय सुरू करणे, (PCMC Budget) सर्व रुग्णालयांत दंत रोग विभाग स्थापन करणे, पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना घरांचे वाटप, वायसीएममध्ये नर्सिंग कॉलेज सुरू करणे,स्टेट ऑफ आर्ट मध्यवर्ती ग्रंथालय सुरू करणे, ‘यशदा’च्या सहकार्याने सुसज्ज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, जुन्या पुणे – मुंबई महामार्गाचे सुशोभीकरण करणे, अर्बन स्केपिंग प्रकल्प पूर्ण करणे, नदी सुधार प्रकल्पांतर्गत मुळा, पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पूर्ण करणे अशा प्रकल्पांवर महापालिका नवीन वर्षात भर देणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.