Pune news : मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अशोक कुमार मिश्र यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ आणि नागपूर विभागातील  6 कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार” (Pune news)प्रदान करून त्यांचा गौरव केला . आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नोव्हेंबर/डिसेंबर 2022 या महिन्यात कर्तव्य बजावताना त्यांच्या सतर्कतेबद्दल, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे परीचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हे पुरस्कार देण्यात आले.

Pimpri News : पीसीसीओई मध्ये मंगळवारी अप्रेंटिस भरती मेळाव्याचे आयोजन

मिश्रा यांनी पुरस्कार प्राप्त कर्मचार्‍यांच्या सतर्कतेचे कौतुक केले आणि नमूद केले की ते प्रत्येकासाठी अनुकरणीय आदर्श आहेत. पुरस्कृत कर्मचार्‍यांनी ट्रॉली क्रॅक शोधणे, चाकातील स्पार्कलिंग शोधणे, हॉट ऍक्सल्स आणि ट्रेनमधून जाणार्‍या स्पार्क आणि धुराची वेळेवर माहिती देणे यासारख्या संरक्षेच्या विविध क्षेत्रांमध्ये ट्रेन सुरक्षितपणे चालविण्याबद्दल त्यांचा मोठी सतर्कता आणि वचनबद्धता दर्शविली. मध्य रेल्वेला सर्व पुरस्कारप्राप्त कर्मचार्‍यांचा अभिमान आहे ज्यांनी त्यांच्या तत्परतेने आणि सतर्कतेने कोणतीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता टाळण्यास मदत केली. (Pune news)सहा महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबई विभागातील दीपू कुमार, फिटर आणि रूपेश गोरखनाथ म्हात्रे, फिटर; नागपूर विभागातील श्री. प्रमेंद्र कुमार शाक्य, तंत्रज्ञ आणि रितेश राजेंद्र जवंजाळ, ट्रॅक मेंटेनर आणि भुसावळ विभागातील श्रेष्ठ खेरे, सहाय्यक स्टेशन मॅनेजर व जयप्रकाश तुळशीराम किमान यांचा समावेश आहे.

आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक; डी वाय नाईक, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी; मुकुल जैन, प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक; एन पी सिंग, प्रधान मुख्य विद्युत अभियंता; सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता आणि मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रधान प्रमुख आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात व्हर्च्युअली (Pune news)सामील झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.