PCMC: आयुक्त परदेश दौऱ्यावर; अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह चार अधिकारी दुबई दौ-यावर गेले आहेत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे आज (सोमवार) पासून 22 जानेवारी पर्यंत आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे.

दुबईमध्ये विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास, त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्याबरोबर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी असणार आहेत. मुंबई, नवी दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे सिटी सेंटर बांधण्यात येणार आहे.

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिवसानिमित्त अभिवादन सभा संपन्न

हा दुबई दौरा आज (सोमवार)पासून रविवार (दि.22) पर्यंत असणार आहे. आयुक्तांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी राजकीय शिष्टाचार व आपत्ती व्यवस्थापन (PCMC) विषयक महत्वाच्या बाबींचे कामकाज पहावे. या कालावधीत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेवू नयेत. या कालावधीमध्ये घेतलेल्या कामकाजाचा अहवाल अलहिदा माझ्या अवलोकनार्थ सादर करावा, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.