Lockdown Update : ‘असा’ असेल लॉकडाउन; सर्व उद्योग राहणार सुरु; आयुक्तांकडून नियमावली जाहीर

PCMC declares regulations of lockdown starting from monday midnight. शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्याकरिता सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून दहा दिवस म्हणजेच 23 जुलैपर्यंत शहरात लॉकडाउन असणार आहे.

एमपीसी न्यूज – शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी, कोरोनाची साखळी तोडण्याकरिता सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून दहा दिवस म्हणजेच 23 जुलैपर्यंत शहरात लॉकडाउन असणार आहे. यामध्ये किराणा दुकान, किरकोळ विक्रेते, सर्व व्यवसाय, भाजी मंडई, आठवडी बाजार, फेरीवाले, बांधकामाची कामे, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे, सर्व खासगी कार्यालये पूर्ण बंद राहणार आहे. तर, शहरातील सर्व उद्योग सुरु राहतील. तर, आयटी पार्क 15 टक्के कर्मचा-यांच्या उपस्थितीत कार्यरत राहील.  याबाबतची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केली आहे.  

शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.10) झालेल्या बैठकीत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात लॉकडाउन असणार आहे. 23 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल.

शहरातील ‘या’ आस्थापना बंद राहतील

# सर्व किराना दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यावसाय 14 ते 18 जुलै पूर्णत: बद राहील. तर, 19 ते 23 जुलै पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत अत्याश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे दुकाने सुरु राहणार आहेत. इतर सर्व दुकाने बंदच राहणार

# झोमॅटो, स्विगी हे ऑनलाईन खाद्य पुरवठा बंद राहणार

# क्रीडांगणे, उद्याने, (मॉर्निंग वॉकला) परवनागी नाही

# उपहारगृह, बार, लॉज, रिसॉर्ट मॉल, बाजार, मार्केट पूर्ण बंद

# सलून, ब्युटी पार्लर, सर्व बंद

# भाजी मंडई, फळ विक्रेते, दैनंदिन बाजार, फेरीवाले 14 ते 18 पर्यंत पूर्ण बंद राहतील. तर, 19 ते 23 पर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत सुरु राहतील

# मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री 14 ते 18 पूर्ण बंद, 19 ते 23 सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत चालू

_MPC_DIR_MPU_II

# शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शिकवणी  पूर्ण बंद

# सार्वजनिक, खासगी वाहने पूर्ण बंद, केवळ अत्यावश्यत सेवेतील वाहने सुरु राहणार

# बांधकामाची कामे पूर्ण बंद

# चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह पूर्ण बंद

# मंगल कार्यालय, लग्न समारंभ पूर्ण बंद (यापूर्वी परवानगी घेतलेले समारंभ 20 व्यक्तीपेक्षा कमी उपस्थित करता येतील.

# धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे पूर्ण बंद,

# सामाजिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रम बंद

# खासगी कार्यालये पूर्ण बंद

# ई-कॉमर्सच्या सेवा बंद 18 जुलैपर्यंत बंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.