PCMC : झिरो वेस्ट स्लम प्रकल्प राबवा; अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत (PCMC) केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांनी संदर्भीय दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. गवळीमाथा गुलाबपुष्प उद्यान येथे प्रायोगिक तत्वावर नवी दिशा अंतर्गत सुरु केलेले झिरो वेस्ट स्लम प्रकल्प इतर क्षेत्रीय कार्यालयातील झोपडपट्टी परिसरामध्ये राबविण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिल्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण2023 या मोहिमेद्वारे  शहरात “कचरा मुक्त शहर” (जी.एफ.सी.) प्रमाणिकरण तपासणी करण्यात येणार आहे.  या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानाचा एक भाग म्हणून 15 सप्टेंबर 2023 पासून ‘इंडियन स्वच्छता लिग 2.0’ आणि सफाईमित्र यांच्याकरिता सेवा व सुरक्षा शिबीराचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

क क्षेत्रीय कार्यालयामधील गवळीमाथा गुलाबपुष्प उद्यान येथे प्रायोगिक तत्वावर नवी दिशा अंतर्गत सुरु केलेले झिरो वेस्ट स्लम प्रकल्प इतर क्षेत्रीय कार्यालयातील झोपडपटटी परिसरामध्ये राबविणेबाबत, तसेच इंडियन स्वच्छता लिग 2.0 ची नियोजन व पूर्वतयारी, कचरा मुक्त शहर प्रमाणीकरण पूर्व  तयारी करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी बैठकीत सूचना दिल्या.

या बैठकीस सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विजयकुमार थोरात, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडीत, अण्णा बोदडे, किरणकुमार मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता एच.पी. बन्सल, जनता संपर्क  अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी राजु साबळे, महादेव शिंदे, तानाजी दाते, महेश आढाव, राजेंद्र भाट , शांताराम माने, कुंडलिक दरवडे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच केपीएमजी, हयुमन मेट्रीक्स सिक्युराईट, ऑल इंडिया इन्स्टीटयुट, बेसिक्स, डिवाईन, जनवाणी या आयईसी संस्थांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या (PCMC) सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी नवी दिशाअंतर्गत शून्य कचरा झोपडपटटीचा  क्षेत्रीयनिहाय आढावा घेतला तसेच शून्य कचरा शहर- जीएफसी, इंडियन स्वच्छता लिग 2.0 याबाबतचे सादरीकरण केपीएमजीचे विनायक पदमने यांनी केले.

Tata Motors News : टाटा मोटर्सने बांधलेल्या अद्ययावत प्रयोगशाळेचे लोकार्पण

क क्षेत्रीय कार्यालयामधील गवळीमाथा गुलाबपुष्प उदयान येथे प्रायोगिक तत्वावर नवी दिशा अंतर्गत सुरु केलेला शून्य कचरा झोपडपटटी प्रकल्प इतर क्षेत्रीय कार्यालयातील झोपडपटटी परिसरामध्ये राबविणेबाबत आयुक्त  सिंह यांनी दिलेल्या सूचनेनुसार  सर्व क्षेत्रीय कार्यालयांची स्लममधील जागा निश्चिती,चालक बचत गट, कुटूंब संख्या, निर्माण होणारा ओला, सुका, घातक कचरा, शेड, विदयुत पुरवठा, आवश्यक साहित्य, मशीन्स, यामध्ये येणा-या समस्या इ. बाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर शहरातील रहिवाशी व व्यावसायिक  ‍ठिकाणे, रस्ते, पदपाथ, डिव्हायडर, गतीरोधक, झोपडपटटी परिसर, ऐतिहासिक, पर्यटन केंद्र, ट्रान्सपोर्ट हब, उदयाने, शैक्षणिक संस्था, जलाशय, नाले, नदीपरिसर व घाट आदी ठिकाणांची स्वच्छता करण्यात यावी अशा सूचना अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी महापालिकेच्या संबधित विभाग प्रमुखांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.