Pimpri News: महापालिका शिल्लक 80 हजार राष्ट्रध्वज शासनाला परत करणार

एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमासाठी महापालिकेने 3 लाख राष्ट्रध्वज खरेदी केले होते. तर, शासनाकडून 1 लाख असे 4 लाख ध्वज महापालिकेला उपलब्ध झाले होते.(pimpri News) यामधील निकृष्ट आणि काही कारणांमुळे 80 हजार राष्ट्रध्वज महापालिकेकडे शिल्लक आहेत. हे ध्वज राज्य शासनाला परत पाठविण्यात येणार आहेत.

Pavana Dam: पवना धरण 100 टक्के भरले

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर आझादी का महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज उपलब्ध होणार नाही. म्हणून महापालिकेने निविदा प्रसिध्द करून राष्ट्रध्वजाची ठेकेदारामार्फत तीन लाख ध्वज खरेदी करून आलेल्या किंमतीत नागरिकांना विकले.राज्य शासनाकडून 1 लाख ध्वज महापालिकेला मिळाले होते.(Pimpri News) यामधील बहुतांशी ध्वज निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे 79 हजार 778 राष्ट्रध्वज नागरिकांना विकता आले नाहीत. हे ध्वज महापालिका राज्य सरकारला परत करणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला एकूण 4 लाख ध्वज उपलब्ध झाले. ठेकेदाराकडून 3 लाख आणि शासनाकडून
सरकार 1 लाख ध्वज मिळाले.(pimpri News) त्यापैकी शासनाकडील 79 हजार 778 ध्वज शिल्लक आहेत. ठेकेदाराच्या एक ध्वजाची किंमत 24 रुपये होती. तर, शासनाकडून आलेल्या ध्वजाची किंमत 20 रुपये 50 पैसे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.