PCMC News : विविध मागण्यांसाठी आपचा महापालिकेवर आक्रोश मोर्चा

एमपीसी न्यूज – वाढीव मालमत्ता शुल्क, हस्तांतर शुल्क रद्द करावे, महापालिकेच्या सर्व रुग्णालयात लहान मुलांचे(NICU) शिशु अतिदक्षता विभाग सुरू करा (PCMC News) अशा विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मोरवाडी कोर्टापासून  पिंपरी-चिंचवड महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मागील दोन दशकात राष्ट्रवादी काँग्रेस व 2017 पासून भाजपचा कारभार जनतेने सहन केला आहे.हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टक्केवारीचे आरोप करत आहेत,एकमेकांवर चिखलफेक करत आहेत.मात्र पाणी पुरवठा,सार्वजनिक आरोग्य सुविधा,सार्वजनिक प्रवासीसेवा,शासकीय घरकुल योजना,नदीसुधार ईई विविध मागण्या प्रलंबित आहेत.स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठे प्रकल्प हाती घेऊन त्यांना मुदतवाढ देऊन अहोरात्र विकासकामे सुरू आहेत. एकमेकांवर चिखलफेक करून जनतेच्या डोळ्यात धूळ टाकणाऱ्या पक्षाना जनतेने धडा शिकवला पाहिजे.भ्रष्ट कारभाराचा चिखल आम आदमी पार्टीचा झाडू हाती घेऊन साफ करण्याची वेळ आली आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केली.

Pune University : अथर्वशीर्ष पठणाचा अभ्यासक्रमात समावेश, पुणे विद्यापीठाचा निर्णय

शहरात मोठ्या प्रमाणात मोहल्ला(जिजाऊ) क्लिनिक सुरू करावे.  मनपाच्या सर्व रुग्णालयात जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) प्रमाणित केलेली सर्व जीवरक्षक व आवश्यक औषधे मोफत उपलब्ध करून केसपेपर शुल्क माफ करावे. सर्व रुग्णालयात लहान मुलांचे(NICU) शिशु अतिदक्षता विभाग सुरू करावे. वायसीएमएच मधील जळीत वॉर्ड त्वरित सुरू करावा. महापालिकेच्या 50 % शाळांमध्ये इंग्रजी माध्यम पाठ्यक्रम सुरू करून किमान 10 शाळा येत्या 2022/23 शैक्षणिक वर्षांमध्ये सेंटर ऑफ एक्सलान्स मॉडेल शाळा सुरू कराव्यात. घरेलू महिला कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांना पालिकेच्या वतीने कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. PMPL मध्ये महिलांना मोफत प्रवासी सुविधा द्यावी. पूर्णत्वाचा दाखला मिळालेला 2016 नंतरच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या कंपोस्टिंग युनिटचा खर्च बिल्डर कडून वसूल करून द्यावा.

शहरातील प्रत्येकाला शासकीय घरकुल योजना उपक्रमातील वाटप झालेल्या सर्व घरांचा ताबा द्यावा.वाढीव मालमत्ता शुल्क हस्तांतर शुल्क रद्द करावे.(PCMC News) मोर्चाच्या शेवटी महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या भोंगळ कराभाराचा भ्रमाचा प्रतीकात्मक फुगा फोडून निषेध करण्यात आला.

यावेळी चेतन बेंद्रे,अनुप शर्मा, राज चाकणे, यशवंत कांबळे, मनोहर पाटील, ज्योती शिंदे, संतोषी नायर, ब्रम्हानंद जाधव, मंगेश आंबेकर, स्मिता पवार, यल्लप्पा वालदोर, शुभम यादव, सरोज कदम, स्वप्नील जेवळे, गोविंद माळी, प्रवीण शिंदे, आशुतोष शेळके, अजय सिंह, रोहित सरनोबत, राजेश सापरे, ओमीन गायकवाड, अजिनाथ सकट, सुंदर ओव्हाळ, महेश पाटील, वहाब शेख, सुरेंद्र कांबळे, चंद्रमनी जावळे,  सर्फराज मुल्ला, मीनाताई जावळे, संजय मोरे, सचिन पवार, वाजीद शेख, संतोष राऊत, अशोक नांगरे, दमयंती नेरकर आणि शहरतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.