PCMC Tax : हस्तांतरित मूल्याच्या निर्णयाचा फेरविचार करा – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर (PCMC Tax) आकारणी व कर संकलन विभागाकडून खरेदी-विक्री व्यवहाराच्या हस्तांतर फीमध्ये 20 पटींनी वाढ केली असून या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, 31 मार्च 2022 नंतरच्या मालमत्ता हस्तांतर फी खरेदी विक्री व्यवहारांचे 1/2 टक्का केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडत आहे.पूर्वी खरेदी विक्री-द्वारे मालमत्ता हस्तांतरण करताना 2 हजार रुपये भरावे लागत होते. परंतु, 31 मार्च 2022 नंतर ही रक्कम 20 पटींनी वाढली आहे. या निर्णयाचा फेरविचार करुन शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणे आकारणी करुन दिलासा द्यावा.

Chandani Chowk Flyover : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी

काही नागरिकांनी 31 मार्च पूर्वी व्यवहार करुन देखील (PCMC Tax) केवळ अर्ज केला नाही. त्यामुळे त्यांना 1/2 टक्का रक्कम भरावी लागत आहे. कोरोना काळ, ज्येष्ठ नागरिक, त्यांची मुले परदेशात असल्यामुळे त्यांच्याकडून नजर चुकीने जाहीर प्रकटनामुळे दुर्लक्ष झाल्याने त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे तूर्तास 31 मार्च 2022 पूर्वी हस्तांतरित केलेल्या लोकांना पूर्वीप्रमाणे शुल्क आकारण्यात यावे. ही अन्यायकारक करवाढ रद्द करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.