Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. पुणे नाशिक रोडवर, पिरबाबा मंदिरासमोर, सोनवणे वस्ती, खेड येथे शुक्रवारी (दि.18) रात्री नऊ वाजता हा अपघात झाला.

बंधन झिमरी मुंडा (वय 25, रा. सोनवणे वस्ती, खेड, मुळगाव पश्चिम बंगाल) असे अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. वेगेल बाबू लामा (वय 22, रा. सोनवणे वस्ती, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि फिर्यादी पुणे नाशिक रोडवर वरुन भोसरीच्या दिशेने जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने मुंडा यांना धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित करण्यात आले. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.