Pimpri : पिंपरी परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

People crowd in pimpri camp main bazaar for shopping people not following social distancing rule.

एमपीसी न्यूज – पिंपरी मुख्य बाजारपेठत आज सकाळ पासून गर्दी पहायला मिळाली, लोकांनी विविध गोष्टींच्या खरेदीसाठी बाहेर पडत ‘सोशल डिस्टन्सिंग’ला हरताळ फासला.

केंद्र व राज्य सरकारने रविवारी (दि.17) रोजी लाॅकडाऊन चार 31 में पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली. मात्र राज्य सरकारांना संबंधित राज्यातील रेड, ग्रीन, ऑरेन्ज आणि कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात आले.

पिंपरी चिंचवड अजूनही रेड झोन मध्ये असलातरी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी नागरिकांनी घराबाहेर पडत पिंपरी परिसरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले.

पिंपरीतील मुख्य बाजारपेठ, शगुन चौक या ठिकाणी अंतर्वस्त्रे, महिला आभूषणे विक्रीसाठी रस्त्यावर मांडण्यात आली होती. सुरक्षित अंतर न ठेवता तसेच मास्क परिधान न‌ करता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

बरेच नागरिक दुचाकी घेऊन खरेदी साठी बाहेर पडत असल्यामुळे पिंपरी बाजारपेठेत गर्दी झाली होती.

नागरिकांना अजूनही कोरोना विषाणूचे गांभीर्य नसल्याने व सार्वजनिक ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्यामुळे अशाने कोरोना जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.