Pune : दिल्लीत अडकलेले विद्यार्थी सोमवारी पहाटे पुण्यात पोहोचले

Pune: Students stranded in Delhi reached Pune on Monday morning

एमपीसी न्यूज – यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून गेलेले 325 विद्यार्थी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. दिल्लीहून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन आज, सोमवारी (दि. 18) पहाटे पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सोडलेली विशेष रेल्वे सोमवारी पहाटे सव्वातीन वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यामध्ये एकूण 325 विद्यार्थी पुणे रेल्वे स्थानकावर उतरले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी आहेत.

सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. कोणताही विद्यार्थी कोरोना संशयित आढळला नाही. सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बस मार्फत पाठविण्यात आले. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बसने पाठवण्यात आले. तसेच काही विद्यार्थी स्वतःच्या वाहनाने घरी गेले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी शासनाचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.