Photo Feature : ताथवडे गॅस स्फोट प्रकरण

एमपीसी न्यूज – ताथवडे येथे बेकायेदेशीरपणे मोठ्या (Photo Feature) गॅस कॅप्सूल मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी करून काढत असताना अचानक आग लागली. ही आग भडकली आणि यामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले. यात तीन वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. तर इतर दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

1. पुणे-बेंगलोर महामार्गावर जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम स्कूल जवळ खासगी मोकळ्या जागेत जाण्यासाठी रस्ता आहे. इथून आतमध्ये टॅंकर नेऊन त्यातून गॅस चोरून काढला जात होता.

2. ज्या ठिकाणी टॅंकरमधून गॅस काढला जात होता तिथे अवघ्या काही फूट अंतरावर एक घर आहे.

3. रविवारी रात्री झालेल्या स्फोटांमध्ये जवळ असलेल्या घराच्या दरवाजावर स्फोटात उडालेल्या कठीण वस्तू लागून दरवाजा (Photo Feature) तुटला आहे.

4. स्फोटात गॅस चोरी करून भरलेले सिलेंडर वाहतूक करण्यासाठी आणलेले वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.

5. स्फोटात वाहनांचे पार्ट लांबवर उडून पडले

6. वाहनाचे काही पार्ट शेजारी असलेल्या झाडांवर वितळून अडकले आहेत.

7.  जेएसपीएम संस्थेची जळालेली स्कूल बस

8.  जेएसपीएम संस्थेच्या दोन स्कूल बस जळून खाक झाल्या. तर एका बसची वायरिंग जळाली आहे.

9.  जळालेली स्कूल बस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.