Pune : शरद पवार यांची पुण्यात 24 ऑक्टोबर रोजी होणार सभा – रोहित पवार

एमपीसी न्यूज : केंद्र आणि राज्य सरकारकडून तरुणांच्या (Pune) प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रेला 24 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सुरुवात होणार आहे. तर त्याच दिवशी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभेच आयोजन होणार असून ते तरुणांना मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथील महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून युवा संघर्ष यात्रेला 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसर्‍या सणाच्या दिवशी सुरुवात होणार आहे.

ही यात्रा शहरातील काही भागात काढली जाणार असून त्यानंतर (Pune) शरद पवार यांची सभा होणार आहे.त्या सभेत शरद पवार हे विद्यार्थी वर्गाच्या समस्या जाणून घेतील आणि त्यानंतर शरद पवार सर्वांना मार्गदर्शन करणार आहे.

तर दुसर्‍या दिवशी वढू तुळपूर येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संघर्ष यात्रा पुढे मार्गस्थ होईल.840 किलो मीटरची पायी यात्रा असणार असून दररोज 17 ते 24 किलोमीटर चालणार आहे.

Tathavade : ताथवडे गॅस स्फोट प्रकरण; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांना फटकारले

ही यात्रा 10 जिल्हे आणि 28 तालुक्यातून जाणार आहे. पुणे, नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम,अमरावती यवतमाळ,वर्धा आणि त्यानंतर अखेर नागपुर येथे पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्ही आजवर बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी साजरी करीत आलो आहे. पण यंदा मी संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. त्यामुळे आमचं कुटुंबी माझ्या सोबत संघर्ष यात्रेत दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.