PIL Against Somatane Toll Plaza : सोमाटणे टोलनाका हटवायचाय? लोकवर्गणीतून जमा करणार हायकोर्टाची रक्कम – मिलिंद अच्युत

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर असून तो कायमचा बंद करण्यात यावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिकेवरील (PIL Against Somatane Toll Plaza) तातडीच्या सुनावणीसाठी तीन लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याची अट मुंबई उच्च न्यायालयात घातली आहे. ही अनामत रक्कम लोकवर्गणीतून जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी टोलनाक्याच्या विरोधात असलेल्या नागरिकांनी न्यायालयीन लढ्यात सहभागी होण्यासाठी अगदी पाच रुपयांपासून पुढे कितीही यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन याचिकाकर्ते मिलिंद अच्युत यांनी केले आहे.

मुंबई-पुणे-बंगळुरू या जुन्या महामार्गावरील सोमाटणे येथील टोल वसुलीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL Against Somatane Toll Plaza) दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर मंगळवारी पार पडलेल्या प्राथमिक सुनावणीनंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावणी आधी 3 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

तातडीने सुनावणी व्हावी अशी मागणी आम्ही हायकोर्टामध्ये केली असता सदर अनामत रक्कम भरण्याचे कोर्टाने निर्देश दिले असल्यामुळे येत्या आठ दिवसात सदर अनामत रक्कम भरावयाची आहे, तरी तमाम मावळवसीयानी पाच रुपयांपासून पुढे कितीही यथाशक्ती रक्कम खालील Google pay अकाउंटवर भरून या टोलविरोधी लढ्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे मिलिंद अच्युत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Google Pay No. 9922859922

राष्ट्रीय महामार्ग 48 च्या (मुंबई-पुणे-बंगळुरु) पुणे येथील सोमाटणे फाटा नाक्यावरील टोल वसुलीला हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटरच्या नियमाचं यात उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेतून केलेला आहे.

प्रमुख याचिकाकर्ते मिलिंद अच्युत यांनी लोकवर्गणीतून व लोक सहभागातून सदर तीन लाख रुपये अनामत रक्कम भरणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. काही राजकारणी मंडळीं सोमटणे टोलनाका बंद होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत परंतु न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून इथून पुढील लढाई न्यायालयामार्फतच लढणार असल्याचे अच्युत यांनी सांगितले.

 

Pune Fire : सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, सहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

 

टोल नाका सुरू झाल्यापासून दिवंगत माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी धनशक्ती विरोधात दंड थोपटले होते. त्यानंतर सोमाटणे टोल नाक्याबाबत पूर्ण माहिती घेतल्यानंतर असा विश्वास बसला आहे की सदर टोल नाका हा अनाधिकृत आहे  व तो कुठल्याही नियमात बसणारा नाही. त्यामुळे सोमाटणे येथील टोलनाका हा इतरत्र हलवून स्थानिकांना या टोल धाडी पासून सुटका मिळावी, अशी मागणी या जनहित याचिकेद्वारे (PIL Against Somatane Toll Plaza) करण्यात आली आहे.

हा लढा अतिशय खडतर आहे. राजकीय मंडळी यात ढवळाढवळ करून मानसिक खच्चीकरण करत आहेत परंतु कितीही वेळ लागला तरी शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा लढणार आहे, असा निर्धार मिलिंद अच्युत यांनी केला आहे.

आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते असून हा टोल नाका सर्व समाजाचा सांघिक विषय असून कोण्या एकाचे घरचे किंवा वैयक्तिक कार्य नाही त्यामुळे सर्व समाजाने फुल ना फुलाची पाकळी मदत करणे अपेक्षित असल्याने सर्वांनी यथाशक्ती आर्थिक मदत करून अनामत रक्कम भरण्यासाठी जनशक्तीची ताकद उभी करावी, असे आवाहन यावेळी मिलिंद अच्युत यांनी केले आहे.

या न्यायालयीन लढ्यासाठी (PIL Against Somatane Toll Plaza) जमा होणाऱ्या लोकवर्गणीतील प्रत्येक रुपयाचा हिशोब जाहीर करण्यात येईल, असेही अच्युत यांनी स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.