BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : बास्केट बॉल आणि टेनिस कोर्ट मैदाने सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – महानगरपालिकेकडून सेक्टर नंबर ९ स्पाईन रोड बास्केट बॉल आणि सेक्टर नंबर ४ येथील टेनिस कोर्ट मैदाने खेळाडूंना अद्याप खेळण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशी मैदाने लवकरात लवकर सुरु करण्यात यावी, अशी नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली.

यासाठी युवासेना जिल्हा युवाधिकारी सूरज हिरामण लांडगे, जिल्हा समन्वयक रुपेश कदम, विधानसभा युवा अधिकारी कुणाल जगनाडे, विपुल टेहरे,किशोर शिंदे, संदेश मुळे, गौरव आसरे, त्रिंबक भिसे, मकरंद कदम यांनी मागणी केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3