Pimpari News : 32 गाड्या अर्ध्या किमतीत काढून देतो’ म्हणत एकाची साडेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर आहे. बजाज कंपनीमधून अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला 32 गाड्या काढून देतो’, असे सांगून दोघांनी मिळून एकाची सात लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना एप्रिल 2020 ते 13 नोव्हेंबर 2020 या कालावधीत वैभवनगर सोसायटी, पिंपरी येथे घडली.

शंकरलाल लालचंद बखत्यारपुरी (वय 50, रा. वैभवनगर सोसायटी, पिंपरी) यांनी याबाबत 8 जुलै 2019 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अविनाश जाधवाणी (वय 25), आकाश जाधवाणी (वय 21, दोघे रा. सुखवाणी केसल सोसायटी, पिंपरीगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना सांगितले की, ‘मी बजाज कंपनी आकुर्डी येथे मोठा ऑफिसर म्हणून नोकरीस आहे. मी बजाज कंपनीमधून अर्ध्या किमती मध्ये तुम्हाला 32 गाड्या काढून देतो’. असे सांगून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सात लाख 60 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपीने फिर्यादी यांना 32 गाड्या दिल्या नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.