Pimple Gurav : ‘मुळशीचा लढा आणि सेनापती बापट’ विषयावर संवादाचे आयोजन

एमपीसी न्यूज – विस्थापितांसाठीचा देशातील पहिला लढा (Pimple Gurav) मुळशी सत्याग्रह. या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. मुळशी लढ्याचे हे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने कलारंजन प्रतिष्ठानने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Alandi : आळंदी मध्ये अतिक्रमणा विरोधात कारवाईला सुरवात

मुळशी सत्याग्रहाचे अभ्यासक व लेखक बबन मिंडे यांच्याशी मुळशीचा लढा आणि सेनापती बापट या विषयावर संवाद साधता येणार आहे. याप्रसंगी  प्रताप साबळे व सुरेश कंक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम संवाद कट्टा, जिजाऊ गार्डन, पिंपळे गुरव या ठिकाणी 8 जून रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी (Pimple Gurav) कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.