Pune : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे विभाग आणि जिल्हा सर्वोत्तम

एमपीसी न्यूज – माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत उच्चतम कामगिरी (Pune) बद्दल पुणे महसूल विभाग राज्यात पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला आहे. त्याशिवाय विविध गटातून एकूण 8 पुरस्कार पुणे जिल्ह्याला प्राप्त झाले.
अमृत गट (राज्यस्तर) अंतर्गत 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात राज्यस्तरावर पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला पहिला क्रमांकाचा आणि पुणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. याच गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला जाहीर झाला.
नगर परिषद व नगर पंचायत गट अंतर्गत 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटामध्ये राज्यस्तरावर लोणावळा नगर परिषदेला दुसऱ्या क्रमांकाचा आणि बारामती नगर परिषदेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. या गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार लोणावळा नगर परिषदेला जाहीर झाला. याच गटात विभागस्तर पुरस्कार अंतर्गत पुणे विभागात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला पुरस्कार जाहीर झाला. 15 ते 25 हजार लोकसंख्या गटात माळेगाव बु. (ता. बारामती) या नगर पंचायतीला राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.
या अभियानात पुणे महसूली विभाग राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारा पहिला क्रमांकाचा विभाग ठरला आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यासाठीचा राज्यस्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पुणे जिल्हाधिकारी यांना जाहीर झाला आहे.
माझी वसुंधरा 3.0 राज्यस्तरावरील पुरस्कार
अमृत शहरे (10 लाखावरील लोकसंख्या) गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई महानगरपालिका द्वितीय आणि पुणे महानगरपालिकेने तृतीय पुरस्कार पटकावला.
अमृत शहरे (3-10 लाख लोकसंख्या) गटात मीरा भाईंदर मनपा, अहमदनगर मनपा आणि पनवेल मनपाने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
अमृत शहरे (1-3 लाख लोकसंख्या) गटात सातारा नगरपालिका, बार्शी नगरपालिका आणि भुसावळ नगरपालिकेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
नगरपरिषद आणि नगरपंचायत (50 हजार ते 1 लाख लोकसंख्या) गटात कराड नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद आणि बारामती नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.

नगरपरिषद आणि नगरपंचायत (25 हजार ते 50 हजार लोकसंख्या) गटात गडहिंग्लज, मोहोळ आणि शिर्डी नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
नगरपरिषद आणि नगरपंचायत ( 15 हजार ते 25 हजार लोकसंख्या) गटात दहिवडी, मालेगाव आणि निफाड नगर पंचायतीनी अनुक्रमे प्रथम तीन पुरस्कार पटकावले.
नगरपरिषद आणि नगरपंचायत ( 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्या) गटात पांचगणी नगरपरिषद, पन्हाळा आणि महाबळेश्वर नगरपरिषद यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.
ग्रामपंचायत ( 10 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या) गटात मंद्रूप (सोलापूर), गुंजाळवाडी ग्रा. पं. ( अहमदनगर) आणि विंचुर ग्रा.पं. (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
ग्रामपंचायत ( 5 ते 10 हजार लोकसंख्या) गटात बोराडी (धुळे), धरणगुट्टी (कोल्हापूर) आणि शिंदे (नाशिक) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
ग्रामपंचायत ( 2.5 ते 5 हजार लोकसंख्या) गटात वाघोली (अहमदनगर), जवळगाव (नांदेड) आणि घाटनांद्रे (सांगली) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
ग्रामपंचायत ( २.५ हजार लोकसंख्या पेक्षा कमी) गटात शिरसाठे (नाशिक), सिंदखेड (बुलढाणा) आणि मन्याची वाडी (सातारा) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
भूमी थीमटिक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये विविध गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, सातारा नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, गडहिंग्लज नगरपरिषद, दहिवडी नगरपंचायत, पांचगणी नगरपरिषद, सोनई ग्रामपंचायत, बोराडी ग्रामपंचायत, वाघोली ग्रामपंचायत, शिरसाठे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त गटात सौरभ राव (पुणे), राधाकृष्ण गमे (नाशिक) आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे), रूचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.
सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गटात जितेंद्र डूडी (सांगली), आशिष येरेकर (अहमदनगर) आणि श्रीमती आशिमा मित्तल (नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने (Pune) गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.