PimpleSaudagar : राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त विठाई वाचनालयास पुस्तके भेट

एमपीसी न्यूज – भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळे गुरव येथील राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन संचलित विठाई वाचनालयास अनेक ऐतिहासिक पुस्तके भेट देण्यात आली. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले यांच्या हस्ते उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्याकडे पुस्तके स्फूर्त करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विवेक तितरमारे,जयराम शिंदे,रमेश वाणी, महेश गवस, रवींद्र पाटील, प्रतीक नवले, अजय खराडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

  • या पुण्यतिथीनिमित्त भारताचे संविधान, शोध राजीव हत्येचा, छत्रपती श्री शिवाजीमहाराज, क्षत्रिय मराठे,जयभीमचे जनक – बाबू हरदास एल एन, सुभेदार रामजी आंबेडकर,आंबेडकर गांधी तीन मुलाखती,हे पाणी आमचे,गोष्ठी बाबासाहेबांच्या,कर्मयोगी गाडगे बाबा ,दलितांची आर्थिक चळवळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, बुद्ध धम्म, महाभारतातील गोष्टी, चक्रवर्ती सम्राट अशोक, धम्मक्रान्तिनंतरची सत्तावन्न वर्षे, रणझुंजार शिदनाक, मी रमाई, पुणे करार, जनतेचा महाराजा सयाजीराव गायकवाड यासह अनेक वाचनीय पुस्तके या वाचनालयास भेट देण्यात आली.

यावेळी संजय भिसे म्हणाले ,सध्याच्या धावपळीच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला पुस्तके वाचण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तरुण पिढीला वाचण्याची गोडी लागावी म्हणून विठाई वाचनालयाची सुरुवात केली. “वाचाल तर वाचाल” त्यामुळे रोज किमान एक तास तरी आवडेल ते पुट वाचले पाहिजे त्यामुळे माणसाच्या सामान्य ज्ञानात भर पडते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.