Pimpri : शोषित घटकांच्या उन्नतीसाठी कटीबध्द -शेखर ओव्हाळ

एमपीसी न्यूज – समाजातील विविध घटकांपर्यंत थोर व्यक्तींचे विचार विविध उपक्रमांव्दारे पोहचविले पाहिजेत. वंचित शोषित घटकाच्या उन्नतीसाठी आपण कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी मंगळवारी पिंपरी येथे केले.

त्यासाठी अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले, क्रांतीगुरु लहूजी वस्ताद साळवे, शोषित समाजाला न्याय्य हक्क मिळवून देणारे छत्रपती शाहू महाराज, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर, अहिल्याबाई होळकर या थोर व्यक्तींचे विचार पुढच्या पिढीला समजण्यासाठी अशा प्रबोधनपर कार्यक्रमांची गरज आहे, असेही शेखर ओव्हाळ यांनी सांगितले.

  • भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी मंगळवारी केले होते.

यावेळी ज्येष्ठ उद्योजक व कार्यक्रमाचे उद्‌घाटक नानासाहेब गायकवाड यांच्या हस्ते गायक आनंद शिंदे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, जावेद शेख, शत्रुघ्न काटे, रोहित काटे, तुषार हिंगे, राजू बनसोडे, शीतल शिंदे, सचिन चिखले, सुलक्षणा धर, तसेच माजी नगरसेवक राजेश पिल्ले, तानाजी खाडे, सनी ओव्हाळ आणि अनूप मोरे, सुरेश निकाळजे, बाबा कांबळे, अजिज शेख, चेतन भूजबळ, पोपट भोंडवे, अमित मेश्राम, कैलास दांगट आदी उपस्थित होते.

  • आनंद शिंदे यांनी भीमवंदना सादर करून कार्यक्रमास सुरुवात केली. यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाव्दारे भारतीय नागरिकांना दिलेल्या हक्कांमुळे वंचित, शोषित घटकांनादेखील विकासाच्या प्रवाहात सामील होण्याची संधी मिळाली. त्यांना अभिवादन करताना ‘‘नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला’’, शिंदे यांनी हे गीत सादर केले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमी विषयी आदर व्यक्त करीत ‘‘दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर’’, हे गीत सादर केले. ‘‘ राजा राणीच्या जोडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला’’, ‘‘उड जायेगा एक दिन पंछी’’ ही कव्वाली आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्रल्हाद शिंदे यांना आदरांजली म्हणून ‘‘वंदना वंदना त्या भीम पाखराला’’, ‘‘त्या राजधानीवरती भगवं निशाण आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे’’ ही गीते सादर केली.

  • कार्यक्रमाच्या आयोजनात माजी उपमहापौर ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, रोहित काटे, जावेद शेख, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, युवा उद्योजक गिरीष जाचक, सुशांत केंजळे, युवा नेते संदीप ढेरंगे, गणेश कदम आदींनी सहभाग घेतला होता.प्रास्ताविक शेखर ओव्हाळ, स्वागत राजू मिसाळ तर सुत्रसंचालन संदीप साकोरे आणि आभार मोरेश्वर भोंडवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.