PimpleSaudagar : आठवडे बाजारातील एक दिवसाचे उत्पन्न शहीद जवानांच्या कुटुंबाला

निलेश काटे युवा मंचच्या वतीने शहीदांना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या वाहनांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये जवान शहीद झाले. पिंपळे सौदागरमधील निलेश काटे युवा मंचच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आठवडे बाजारातील शेतक-यांचे एक दिवसाचे उत्पन्न शहिद जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या हल्ल्याचा सर्वच स्तरांतून तीव्र निषेध होत आहे. पिंपळे सौदागर येथील निलेश काटे युवा मंचच्यावतीने या हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मेणबत्ती पेटून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली. युवानेते निलेश काटे यांच्यावतीने आयोजित होत असलेल्या आठवडे बाजारातील शेतक-यांनी देखील सहभाग नोंदवला.

  • रामकृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या सर्व शेतक-यांनी त्यांचे एक दिवसाचे उत्पन्न शहीद जवानांच्या कुटिंबियांना देण्याचा निर्णय घेतला. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय, भ्याड बल्ला करणा-या अतिरेक्यांचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.