Pimpri : ब्रँडेड कंपनीच्या नावाने बनावट मालाची विक्री, तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ब्रँडेड कंपनीच्या नावाने (Pimpri)  दुकानदारांनी बनावट मालाची विक्री केली. याप्रकरणी कारवाई करत तीन दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी पिंपरी येथे करण्यात आली.

जीन्स पॉइंटचे दीपक अशोककुमार सिंग (वय 30, रा. पिंपरी गाव), लेजंड चॉईसचे साजिद हैदरअली शेख (वय 20, रा. काळेवाडी), रामा बॅग कंपनीचे हिरानंद खूपचंद गंगवाणी (वय 59, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सागर अशोक आबनावे (वय 39, रा. पद्मावती पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी Louis Vuitton (lv) या कंपनीच्या (Pimpri) मालकीचा बनावट माल त्यांच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवला. याप्रकरणी माहिती मिळाली असता पिंपरी पोलिसांनी तीन दुकानांवर कारवाई करत तीन लाख 82 हजारांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रतिलिपी अधिकार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.