Pimpri: पिंपरीत 10 बॉक्स गायछाप, काळेवाडीत 275 लिटर ताडी जप्त

एमपीसी न्यूज –  कोरोनामुळे बंदी असतानाही काळेवाडीत 275 लिटर ताडी बाळगणार्‍या एकाविरूद्ध तसेच पिंपरीत 10 बॉक्स गायछाप घेऊन जाणार्‍या दुचाकी चालकाविरूद्ध  पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी-मोरवाडी येथे केलेल्या कारवाईत अमोल चंद्रकांत मंडले (वय 34, रा. मोरवाडी, पिंपरी)  याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई शैलेश मगर (वय 32) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरानामुळे सध्या संचारबंदी लागू आहे.

अमोल घरोंदा हॉटेलसमोर दुचाकीवरून चालला होता. पोलिसांनी संशयावरून त्याची  दुचाकी अडविली. तपासणी केली असता अमोलकडे गायछाप तंबाखूचे चार हजार रूपये किमतीचे 10 बॉक्स आढळून आले. त्याच्याकडून दुचाकी आणि तंबाखू असा 44 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

काळेवाडी येथे केलेल्या कारवाईत अंबादास तेलंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक टी. ए. शेटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळेवाडी स्मशानभुमीजवळ एका पत्राशेडमध्ये बेकायदा ताडीचा साठा केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. पोलिसांनी 16 हजार 500 रूपये किमतीची 275 लिटर ताडी विक्रीकरिता जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले. आरोपींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी आणि साथीचे रोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.