Pimpri: भारताला समृद्ध राष्ट्र करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज – भारत देशाला समृध्द राष्ट्र करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन, मत सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले.केंद्र शासनाच्या खेल व युवक कल्याण मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने युवक विकास उपक्रमाअंतर्गत मणिपूर, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा व नागालॅंड या पूर्वोत्तर राज्यातून पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देण्यास आलेल्या अभ्यागत विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. 

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, पंडीत डॉ. नंदकिशोर कपोते, भारत सरकार खेल मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्राच्या संचालिका संध्या देवतळे, समन्वयक यशवंत मानखेडकर, व्ही. डी. काळे, कुसूम ससाणे, कार्यालयीन अधिक्षक हरी ठाकरे, संजय कुरणे, राष्ट्रीय युवा पुरस्कारर्थी प्रविण निकम, दहा वर्षांचा बाल शास्त्रज्ञ हेमांग येलोरे, माहिती व जनसंपर्क विभगाचे रमेश भोसले व आठ राज्यातून दोनशे अभ्यागत विद्यार्थी प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

यावेळी एकनाथ पवार म्हणाले, आपण वेगवेगळया राज्यांतुन पिंपरी-चिंचवड या नगरीला भेट देण्यासाठी आला आहात. शहरवासीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. आपण ज्या राज्यातुन आला आहात. त्या राज्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, देशपातळीवर आपल्या राज्यांचा नावलौकीक व्हावा. 

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर हे गेल्या 10 वर्षात झपाटयाने वाढलेले शहर आहे. या शहराचे औद्योगीकरण मोठया प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे विकासाच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. या शहराच्या औद्योगिकी करणाबरोबर शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, रस्ते विकास इत्यादी पायाभूत सुविधामध्ये मोठया प्रमाणावर प्रगती
झाली आहे. 

उपमहापौर शैलजा मोरे व नगरसदस्या अनुराधा गोरखे यांनीही अभ्यागत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी केले. तर आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.