Pimpri: आनंदाची बातमी! पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’, आज घरी सोडणार!

दुस-या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह

0

एमपीसी न्यूज – पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले तीन रुग्ण ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले आहेत. त्यांच्या दुस-या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने त्यांना घरी सोडून देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. आता नऊ कोरोना बाधित रुग्ण आहेत. कोरोनाचे रुग्ण ठणठणीत होत असल्याने ही सर्वांत मोठी शहरवासीयांना दिलासा देणारी बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 12 मार्च रोजी हे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोनाबधित हे पहिले रुग्ण होते. त्यानंतर शहरातील रुग्णांचा आकडा वाढत जात असल्याने राज्याचे शहराकडे लक्ष लागले होते. या पहिल्या पॉझिटीव्ह तीन पुरुष रुग्णांचे 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि.25) त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर गुरुवारी (दि.26) पुन्हा एकदा या तिघांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.

या दुसऱ्या तपासणीत देखील त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ झाल्याचे स्पष्ट झाले. या तीन रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like