एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 318 आणि  शहराबाहेरील 17 अशा 335  जणांना आज (रविवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 318  जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.  दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या  7276 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरीतील 60 वर्षीय वृद्ध, आकुर्डीतील 43 वर्षीय आणि 68 वर्षीय पुरुष, सांगवीतील 57 वर्षीय पुरुष,  चर्होलीतील 61 वर्षीय वृद्ध महिला अशा शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, शहराबाहेरील मारुंजीतील 48 वर्षीय पुरुष,  बीड जिल्ह्यातील 95 वर्षीय वृद्धाचा आणि  देहूरोड मधील 46 वर्षीय महिलेचा आज उपचारादरम्यान वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 7276 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 4312 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 107 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 39 अशा 146 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2465 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 683
# पॉझिटीव्ह रुग्ण – 335
#निगेटीव्ह रुग्ण – 439
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 2083
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2465
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 693
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 7276
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 2465
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 146
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 4312
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 20198
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 65619