_MPC_DIR_MPU_III

Pimpri: पहिल्या नऊ महिन्यात 35 टक्के बजेट खर्ची; पुढील महिन्यात विकासकामांचा धडाका सुरु होणार

एमपीसी न्यूज – ‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2019-20 या आर्थिक वर्षांचे पहिल्या नऊ महिन्यात केवळ 35 टक्के बजेट खर्च झाले आहे. त्यामध्ये विकासकामांवर (भांडवली) 632.50 कोटी रुपये झाला आहे. तर, विकासकामांपेक्षा वेतनावर (महसुली) तब्बल 940.15 कोटी रुपये खर्च झाले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे तीनच महिने आर्थिक वर्ष संपण्यासाठी शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यात विकासकामांचा धडाका सुरु होण्याची शक्यता आहे.

_MPC_DIR_MPU_IV

महापालिकेचे 2019-2020 या आर्थिक वर्षाचे मूळ बजेट 4 हजार 590 कोटी तर सुधारीत 4 चार 966.85 कोटी रुपयांचे आहे. आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात 35 टक्के बजट खर्ची पडले आहे. या आर्थिक वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दोन आचारसंहिता आल्या. लोकसभेची तब्बल तीन महिने आचारसंहिता होती. तर, विधानसभेची दीड महिने आचारसंहिता होती. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा झाला होता. विकासकामे रखडली होती.

_MPC_DIR_MPU_II

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात विकासकामांवर 632.50 टक्के खर्च झाला आहे. केवळ 25.66 टक्के विकासकामांवर खर्च झाले आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठ्यासह विविध विकासकामांचा समावेश आहे. तर, वेतनावर विकासकामांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. वेतनावर तब्बल 940.15 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आता विकासकामांचा धडाका सुरु होईल. मोठ्या प्रमाणात नवीन विकास कामे काढली जाण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे म्हणाले, ”महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षांतील आजपर्यंत 35 टक्के बजेट खर्ची झाले आहे. त्यामध्ये महसुलीवर 940.15 कोटी रुपये तर भांडवली 632.50 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने शिल्लक आहेत. आगामी काळात विकासकामांसाठी खर्च वाढेल. गतवर्षी 75 टक्के बजेट खर्ची पडले होते. यावर्षी 80 टक्के बजेटचा खर्च करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे”.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.