Pimpri: भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी; युवक काँग्रेसची मागणी, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घाला

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करुन भाजपने खोडासळपाण केला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजपने त्वरित महाराष्ट्राची जाहीर माफी मागून ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. शिवस्माराकाच्या कामातही घोटाळा करणाऱ्या भाजपला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपकडून नरेंद्र मोदी आणि शिवरायांची तुलना करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे.

या अगोदरही अजयकुमार बिष्ट आणि विजय गोयल यांनी नरेंद्र मोदी यांची शिवरायांशी तुलना करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याचाच पुढचा भाग म्हणजे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’च्या माध्यमातून भाजकडून देशाला वेठीस धरले जात आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा भूमिका कायम घेतल्या जातात. नरेंद्र मोदी यांची कोणत्याच अर्थाने छत्रपती शिवरायांसोबत तुलना होऊ शकत नाही, असेही पत्रात म्हटले आहे.

पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभेचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवडचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे यांच्या पत्रकावर स्वाक्ष-या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.