Pimpri : सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांच्या कारभाराची चौकशी करण्याची ‘आप’ची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन (Pimpri) विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून, त्याबाबत अनेक नागरीकांनी, सामाजिक संघटनांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. महापालिका प्रशासनाने विभागातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालत या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. असा आरोप करत आपच्या युवक शहर अध्यक्ष रविराज काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करसंकलन विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

यामध्ये औद्योगिक मिळकतीच्या चुकीच्या पद्धतीने लावलेल्या नोंदी, मोबाईल टॉवरच्या नोंदीत नियमांचा केलेला भंग, व्यावसायीक नोंदी अशा विविध प्रकरणाचा समावेश असून महापालिकेचे जवळपास पाचशे कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे काळे याांनी पत्रकात सांगितले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांच्या 65 मिळकती जप्त केल्या जातात.

परंतु, शेकडो कोटींच्या मिळकतींचा कर थकलेला असुनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. असेही म्हंटले.

Pimpri : महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस साजरा

तसेच आपणाकडून याप्रकरणी दखल घेतली गेली नाही तर आम आदमी पार्टी येत्या निवडणुकीत प्रशासन काळातील भ्रष्टाचार समोर आणू, असेही त्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना सांगितले.

याबाबत त्यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन तक्रार केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरच कर संकलन विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करू असे आश्वासन दिल्याचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.