Pimpri : महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri)आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 13) राष्ट्रीय आपत्ती निवारण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील फ क्षेत्रीय कार्यालय, ब क्षेत्रीय कार्यालय, ड क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा रुग्णालय सांगवी या ठिकाणी अग्नि सुरक्षितता व आपत्ती जन्य परिस्थितीत बचाव प्रणाली यासंबंधी मार्गदर्शन करून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य, गौतम इंगवले, विजय घुगे, लीडिंग फायरमन विकास नाईक व अग्निशमन कर्मचारी, पालिकेचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत (Pimpri)शाळा, महाविद्यालय, औद्योगिक वसाहती, कार्यालय, हाउसिंग सोसायटी, मॉल अशा ठिकाणी अग्निशमन व आपत्ती विषयक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.