Pimpri : दारूच्या नशेत महिलेशी गैरवर्तन, मद्यपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-  दारूच्या नशेत एका तरुणाने कारचालक महिलेचा विनयभंग ( Pimpri ) केला. तसेच तिच्या सोबत असलेल्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली. ही घटना पाच ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजता अजमेरा चौक पिंपरी येथे घडली.

Dighi : दिघी, बोपखेलचा समावेश पिंपरी-चिंचवड तहसीलमध्ये करण्याची मागणी!

सिकंदर अब्दुल अहमद शहा (वय 26, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कारमधून अजमेरा चौकातून जात होत्या. फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या वृद्ध व्यक्तीला पान खायचे असल्याने चौकात गाडी थांबवून ते पान आणण्यासाठी गेले. त्यावेळी फिर्यादी गाडीतच होत्या.

तिथे आरोपी दारू पिऊन आला. त्याने फिर्यादीस अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनायभंग केला. तसेच फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या वृद्ध व्यक्तीला आरोपीने हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस  ( Pimpri ) तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.