-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119 नागरिकांवर कारवाई; 17,850 रुपये दंड वसूल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आज (दि.13) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या 119 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार आज एकूण रूपये 17,850 इतका दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. प्रतिव्यक्ती 150 रूपयेप्रमाणे 119 नागरिकांवर आज कारवाई करण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हि कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे नागरिकांनी कटाक्षाने टाळावे असे आवाहन पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn