Pimpri : आदित्य ठाकरे यांची पिंपरीत चौफेर टोलेबाजी

एमपीसी न्यूज – युवा नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी (दि. 21) पिंपरीत(Pimpri) सभा घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योगधंदे, कृषी क्षेत्रासह राज्य सरकारवर चौफेर टोलेबाजी केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी बाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आमच्यासाठी राज्यात फक्त मावळ लोकसभाच नाहीतर सर्वच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले, “आज राज्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय (Pimpri)होत आहे. राज्यातील सर्व उद्योग धंदे राज्य बाहेर पाठवले जात आहेत. आमच्या तोंडाचे घास देखील पळवले जात आहेत.
उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र कोलमडले आहे. मुख्यमंत्री घटना बाह्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रत्येक सीटवर जिंकून येणं हे खूप महत्त्वाच आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी प्रत्येक उमेदवार जिद्दीन आणि ताकदीने जिंकन गरजेचं आहे असं मत युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पिंपरी चिंचवड शहरात बोलताना व्यक्त केला आहे.

 

Bhosari : राम मंदिर प्राणप्रतिष्ठादिनी दिवाळी साजरी करण्याचे आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

ज्या मंत्र्यांना त्यांच्या खात्याबद्दल किती जास्त माहित आहे. हे मला माहित नाही. कारण मागच्या वेळेस जेव्हा वेदांत फॉक्स कॉन आणि टाटा एअरबस इथून जेव्हा निघून गेले हे त्यांना माहितीच नव्हतं म्हणून मला त्यांच्यावर जास्त टीका करायची नाही आहे. ज्यांना माहित नाही त्यांच्यावर टीका करून काय अर्थ. आधी त्यांनी स्वतःच्या खात्याची ओळख करून घ्यायला हवी अशी टीका आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर केली आहे.
 उद्योगधंद्यांबाबत बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी जे आपल्या राज्यासाठी इकॉनॉमिक कौन्सिल बनवलं त्या कौन्सिलचे अध्यक्ष गुजरात मध्ये जाऊन 17000 कोटीची गुंतवणूक करत असतात. शेवटी राज्यात उद्योगधंदे तेव्हाच येतात जेव्हा उद्योगधंद्यांना वाटतं की राज्यामध्ये राजकीय स्थिरता आहे.
मात्र आपल्या राज्यात राजकीय स्थिरताच नाही. मागच्यावेळी दाओस मध्ये जे 80 हजार कोटी रुपयाचे करार झाले त्यातले एकही करार अमलात आला नाही. कदाचित उद्योग धंदे चालकांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल. जे नेते आपल्याच पक्षाचे चाळीस आमदार घेऊन पळाले ते कदाचित आपल्याही मॅनेजरना देखील घेऊन पळून जातील असा त्यांना वाटत असेल, म्हणून ते आपल्या राज्यात गुंतवणूक करत नाहीत,असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.