Pimpri : सकल ब्राह्मण समाजाचे पिंपरी येथे आंदोलन

एमपीसी न्यूज – परळी वैजनाथ येथे केलेल्या भाषणाबाबत केतकी चितळे आणि बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर (Pimpri)दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाज पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने पिंपरी येथे आंदोलन करण्यात आले. समाजाकडून निदर्शने करून ही मागणी करण्यात आली.

यावेळी वसंतराव शेवडे, सुभाष फाटक, डॉ सचिन बोधणी, (Pimpri)अविनाश जोशी पालमकर, मंजिरी सहस्त्रबुद्धे, आश्विनी मेहरूनकर, दीपा रंगन, प्रभाकरन जी, रामकृष्ण जोशी पालमकर, श्रीपाद मेहरूनकर, श्रीवत्स जी आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Court : मोशी येथील न्यायालयाची इमारत अतिशय उत्कृष्ठ निर्माण होईल – न्यायमूर्ती भूषण गवई

परळी वैजनाथ येथे 25 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद पार पडली. या परिषदेत केतकी चितळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावरून कार्यक्रमाचे आयोजक बाजीराव धर्माधिकारी आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

याच्या निषेधार्थ सकल ब्राह्मण समाज पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने पिंपरी येथे निदर्शने करण्यात आली. खोटे गुन्हे मागे घ्यावेत. तसेच ब्राह्मण समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी. ब्राह्मण समाजाबाबत वारंवार अपशब्द बोलणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.