Pimpri : आकुर्डी ते विद्यानगर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- आकुर्डी ते परशुराम चौक विद्यानगर चिंचवड या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर एमआयडीसी मार्फत पाण्याची मोठी पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता पुन्हा खोदण्यात आला. मात्र या रस्त्याची अत्यंत निकृष्ट पद्धतीने डागडुजी केल्यामुळे रस्त्यावर खाडी पसरली आहे. या खाडीवरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगनपालिकेच्या मार्फत सहा महिन्यापूर्वी आकुर्डी ते परशुराम चौक विद्यानगर चिंचवड, पुणे येथे नवीन मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. दरम्यानच्या काळात या रस्त्यावर एमआयडीसी मार्फत मोठी पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला. पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांनी खुडडे भरण्याचे काम सुरू झाले. मात्र ठिकठिकाणी तात्पुरती डागडुजी करण्यात आली.

डांबराचा वापर कमी झाल्यामुळे परिणामी लहान मोठी अवजड वाहने जाऊन खाद्यामधील खडी रस्त्यावर पसरल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खडीवरून वाहने घसरून अपघात होत आहेत. आकुर्डी ते विद्यानगर हा मुख्य मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर वाहन व नागरिकांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल कळसे यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.