Pimpri : ‘महापालिका निवडणुका कायमच्याच रद्द केल्याचे जाहीर करा’

एमपीसी न्यूज – राज्यातील महापालिकांच्या निवडणुका जवळपास (Pimpri)मागील दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील महापालिकेच्या निवडणुका कायमच्यायच रद्द केल्याचे शासनाने जाहीर करावे अशी उपरोधिक मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी केली आहे.

अग्रवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका या-ना त्या कारणने पुढे पुढे ढकलल्या जात आहे. जेव्हा महापालिकेत जनप्रतिनिधी नाहीत त्या वेळा तिथे करोभार सत्ताधारी राज्य सरकार चालवते. त्यामुळे राज्यात सत्तेत असणाऱ्या नेत्यासाठी जेवढी निवडणुका उशीरा होईल तेवढे चांगले आहे.

Pimpri : हॉकर्स झोनची लवकरच अंमलबजावणी – आयुक्त शेखर सिंह

मागच्या वेळी नगरसेवक असलेले माजी नगरसेवक राज्यात सतत (Pimpri)बदलणाऱ्या सत्ता समीकरणामुळे संभ्रमात आहेत. पण दोन दोन वर्षे महानगरपालिकेची निवडणुकाच नाही हे लोकशाही साठी घातक चित्र आहे. पण जाब विचारणार तरी कोण आणि कोणाला ? राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होऊ शकते, अनेक राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत.

काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागतील. तरी देखील महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत. जर राज्य सरकारला या निवडणुका घ्याच्याच नसतील. तर त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका कायमच्याच रद्द केल्या आहेत असे जाहीर करावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.