Pimpri : हॉकर्स झोनची लवकरच अंमलबजावणी – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहराचे योग्य नियोजन करण्यासाठी (Pimpri) पथ विक्रेत्यांसाठी आठही क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत चांगल्या हॉकर झोनची निर्मिती लवकरच करणार असल्याची घोषणा शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी केली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खराटे, सहाय्यक आयुक्त विजय सरनाईक,(Pimpri) शहर फेरीवाला समितीचे सदस्य तथा कामगार नेते काशिनाथ नखाते, क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे, सिताराम बहुरे, अण्णा, बोदडे, शितल वाकडे , राजेश आगळे,अमित पंडित, फेरीवाला समितीचे सदस्य प्रल्हाद कांबळे, राजेंद्र वाकचौरे, डॉ.सरोज अंबिके, अँड बी.के. कांबळे आदी उपस्थित होते.

Metro : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली स्वारगेट मल्टी मोडल हबची पाहणी

महापालिकेकडून पथ विक्रेत्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात येते होती. ही कारवाई थांबवण्यात यावी. कायदेशीर हक्काची जागा देण्यात यावी. फेरीवाला कायद्याचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आहे. त्या सुनावणीनुसार महापालिकेने आता कामकाज सुरू केले आहे. आठही प्रभागांमध्ये काही जागा हॉकर झोनसाठी सुचवल्या, त्यावर चर्चा झाली.

यावेळी नखाते म्हणाले की, महापालिका क्षेत्रामध्ये जागा निवडत असताना आम्ही अनेक जागा सुचवू त्या जागेवरती सकारात्मक विचार व्हावा. कारण फेरीवाला संघटनेला विश्वासात घेऊन नियोजन केल्यास चांगल्या पद्धतीने झोन निर्मिती होईल अन्यथा जागा ओस पडतील . तसेच झोनच्या ठिकाणी वीज, पाणी स्वच्छतागृह देण्यात यावे. तसेच फेरीवाला शुल्क आकारणीबाबत ही कमीत कमी असावी. तसेच बोगस सर्वेक्षण रद्द करून प्रामाणिक विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.