Pimpri: बापरे!; दहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील एका दहा महिन्याच्या बाळाचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, आजपर्यंत शहरातील 13 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील एका येथील दहा महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 9 वर्षाच्या एका मुलाचे देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंत शहरातील 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 13 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील चार आणि महापालिका हद्दीबाहेरील चार अशा आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले होते. त्यामध्ये दहा महिन्याच्या बाळासह तीन लहान मुले, दोन लहान मुली आणि दोन तरुण व एका प्रौढाचा समावेश आहे.

बाळासह चारजण पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील रहिवासी आहेत. तर दोन मुलींसह एक युवक व प्रौढ व्यक्ती देहूरोड, पुणे रेल्वे स्टेशन व रविवार पेठ परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.