Pimpri : रसायनमिश्रित कचरा जाळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील विद्यानगर, दत्तनगर, रामनगर परिसरात एमआयडीसी परिसरातील रसायनमिश्रित कचरा उघड्यावर टाकला जात आहे. तसेच या कच-याला वारंवार आग लागण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी याबाबत महापालिका आणि अग्निशमन विभागाशी चर्चा करून कचरा उचलण्याची मागणी केली आहे.

चिंचवड येथील एमआयडीसी परिसरातील कंपन्यांकडून विद्यानगर, दत्तनगर, रामनगर परिसरातील मोकळ्या जागेवर कचरा टाकला जातो. यामध्ये रसायनमिश्रित कचरा मोठ्या प्रमाणावर असतो. तसेच या कच-याला वारंवार आग लागल्याचे प्रकार घडतात. या आगीचे लोट परिसरातील नागरिक वसाहतीत पसरतात. हा धूर नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे परिसरातील  नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागाच्या अधिका-यांशी चर्चा केली. महापालिकेच्या अधिका-यांनी परिसरातील कचरा लवकरात लवकर हटविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच त्यावर तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे. अग्निशमन विभागाचे प्रताप चव्हाण, परशुराम बसरकोड, लखन गुजले, राजू भोसले, पांडुरंग भुसणे, सुरेश हेळवार आदींनी परिश्रम घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.