Pimpri-Chinchwad theft : पिंपरी,चिंचवड येथून दुचाकी व रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज पिंपरी येथून दुचाकी तर चिंचवड (Pimpri-Chinchwad theft) येथून रिक्षा मंगळवारी (दि.8) चोरीला गेली आहेत. या दोन्ही चोरी प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.9) दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत अतुल भारत कदम (वय 23 रा. चिंचवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांची 15 हजार रुपयांची दुचाकी (एमएच 14 वाय 8644) ही वायसीएम हॉस्पिटलच्या पार्कींगमधून चोरीला गेली आहे.यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : महापालिका प्राथमिक शिक्षकांना लागू होणार धन्वंतरी योजना

दुसऱ्या घटनेत सचिन विश्वनाथ सोनावणे (वय 32 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून ते रिक्षा चालक असून त्यांची 75 हजार रुपयांची रिक्षा  (एमएच 14 एचएम 7629) चिंचवड (Pimpri-Chinchwad theft) येथील आनंद नगर येथे रोडवर पार्क कलेली रिक्षा चोरून नेली आहे. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.