Pimpri : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या पिंपरी-चिंचवड बंद; सकल मराठा समाजाचे आवाहन

एमपीसी न्यूज : सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Pimpri) राज्य सरकारने मंजूरी दिली असली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी राज्यसरकारने राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणास सुरुवात केलेली आहे.  त्यांनी पुकारलेल्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात बंद पुकारण्यात आला आहे. 

या बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यासाठी बुधवारी शहरात रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

Pune : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – डॉ. सुनील भिरूड

पुन्हा उपोषण कशासाठी? 

जानेवारीत आपल्या लाखो सहकाऱ्यांसह जरांगे पाटील मुंबईत धडकले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले व आंदोलन स्थगित केले. सगेसोयरे यांना जात दाखले देण्याचा अध्यादेश काढला. त्याचे कायद्यात रूपांतर व्हावे तसेच अंतरवली सराटीसह महाराष्ट्रातील विविध (Pimpri) ठिकाणी आरक्षण आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत सरकारने मराठा समाजास दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.

कशी असणार रॅली? 

बुधवारी शहर बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बुधवार  14 रोजी सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवड शहर व मावळ तालुक्याच्या वतीने भव्य दुचाकी व चार चाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरवात बुधवारी सकाळी नऊ वाजता डांगे चौक थेरगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात येणार आहे.  रॅली तेथून पुढे काळेवाडी फाटा, जगताप डेअरी,रहाटणी, पिंपरीगाव मार्गे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,पिंपरी येथे जाणार आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स रॅली चिंचवड स्टेशन,आकुर्डी,भक्ती शक्ती समूह शिल्प निगडी कडे जाणार आहे.  रॅली तळेगाव मार्गे वडगाव कडे रवाना होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक वडगाव मावळ येथे रॅलीचा समारोप होणार आहे.  रॅलीचे नियोजन सतिश काळे,सचिन बारणे,प्रकाश जाधव,भाऊ ढोरे,वैभव जाधव,नरेंद्र मुर्हे,अमोल ढोरे,नकुल भोईर,रावसाहेब गंगाधरे,विशाल मुर्हे,गणेश देवराम,संतोष शिंदे,सागर चिंचवडे,अरुण पवार,लहू लांडगे शिवाजी पाडुळे,पोपट काळभोर, मारुती भापकर,सुनिता शिंदे,सचिन काळभोर इत्यादी कार्यकर्ते करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.