Pimpri Chinchwad Crime News : भोसरी, हिंजवडी, वाकडमधून लाखो रुपयांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भोसरी, हिंजवडी आणि वाकड परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी आलेल्या चार जणांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून सहा लाख 78 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गणेश दलाराम चौधरी (वय 20), सुरेश दलाराम चौधरी (वय 34, दोघे रा. गणेशनगर, भोसरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून 9 हजार 293 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि दीड लाख रुपयांची कार असा एकूण एक लाख 59 हजार 293 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलिसांनी गुटखा विक्रीसाठी निघालेल्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख 73 हजार 685 रुपयांचा गुटखा आणि एक लाख 75 हजारांचे एक वाहन जप्त केले. पुनाराम मुळाराम सैंचा (वय 41, रा. बावधन) असे ताब्यात घेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

वाकड पोलिसांनी लिंक रोड, रहाटणी येथील तापकीर मळा चौकात एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार 186 रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ आणि 45 हजारांचे वाहन असा एकूण 70 हजार 186 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुनील लल्लू कुमार (वय 36, रा. नढेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.