गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Pimpri Molestation : रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीला छेडणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रस्त्याने जाणाऱ्या तरुणीला पाहून अश्लील चाळे करत विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri molestation) हा प्रकार सोमवारी (दि. 26) दुपारी वल्लभनगर ते संत तुकाराम नगर पिंपरी या दरम्यानच्या रस्त्यावर घडला.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रस्त्याने जात असताना आरोपी दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादीला आवाज देऊन त्यांच्यासमोर अश्लील चाळे केले.(Pimpri molestation) फिर्यादीने दुर्लक्ष केले असता तो पुन्हा समोर येऊन अश्लील चाळे करू लागला. त्यानंतर फिर्यादी घाबरून जात असताना त्याने फिर्यादी जवळ येऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. फिर्यादीने त्याच्याकडे रागाने पाहिले असता तो दुचाकीवरून संत तुकाराम नगरच्या दिशेने निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

Latest news
Related news