Pimpri:दिलासादायक; पिंपरी-चिंचवड शहरातील 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संशयित म्हणून महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ही दिलासादायक बाब आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 48 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून दररोज रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत.

आठ दिवसात तब्बल नवीन 27 रुग्णांची भर पडली आहे. आज थोडीसी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

 • आजचा वैद्यकीय अहवाल :
  #दाखल झालेले संशयित रुग्ण – 99
  # पॉझिटीव्ह रुग्ण – 01
  #निगेटीव्ह रुग्ण – 71
  #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 99
  #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 130
  #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 71
  #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 48
  # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 35
  #वायसीएममध्ये 31 तर पुण्यात चार जणांवर उपचार सुरु
  # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 1
  #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 12
  # दैनंदिन भेट दिलेली घरे – 14868
  #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 45673

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.