Pimpri Corona News : शहरात आज 542 जणांना डिस्चार्ज, 419 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 542 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच, विविध भागातील 419 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (रविवारी) नोंद झाली.

शहरातील 20 आणि महापालिका हद्दीबाहेरील 13 अशा 33 जणांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 50 हजार 153 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या 5 हजार 205 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 659 रुग्ण गृहविलगीकरणात असून 2 हजार 546 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 163 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 1 हजार 179 आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.