Pimpri Corona Update : शहरात आज 128 नवीन रुग्णांची नोंद, 84 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 113 आणि महापालिका हद्दीबाहेरील 15 अशा 128 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 84 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील एक आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन अशा तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चऱ्होलीतील 55 वर्षीय पुरुष, मरकळ येथील 72 वर्षीय महिला आणि खालापूर येथील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 641 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 795 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1816 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रुग्णालयात उपचार घेणार्‍या 763 अशा 2579 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 628 सक्रीय रुग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 425 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 7479 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 428 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.