Pimpri Corona Update : रविवारी शहरात 140 नवीन रुग्ण; 168 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 29) दिवसभरात 140 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 69 हजार 335 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 63 हजार 761 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहराबाहेरील एक तर शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 395 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात एक हजार 439 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 808 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 631 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 19 हजार 181 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 14 लाख 29 हजार 897 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.