Pimpri corona Update : शहरात आज 152 नवीन रुग्णांची नोंद, 161 जणांना डिस्चार्ज; 1 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 151 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 152 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील जाधववाडीतील 46 वर्षीय महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आजपर्यंत 97 हजार 623 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 94 हजार 158 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1768 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 735 अशा 2503 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 531 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 2307 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.