Pimpri Corona Update : शहरात आज 216 नवीन रुग्णांची नोंद, 209 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 216 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 209 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 1 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 323 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 62 हजार 829 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 118 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 225 रुग्ण गृहविलगीकरणात असून 896 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 43 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 411 आहेत. आज दिवसभरात 3 हजार 65 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 9 लाख 48 हजार 861 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.