Pimpri Corona Update :   शहरात आज 235 नवीन रुग्णांची नोंद, 34 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शहराच्या विविध भागातील 227 आणि महापालिका हद्दीबाहेरील 8 अशा 235 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील एकाचाही आज कोरोनाने मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 2237 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 98 हजार 97 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1827 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 771  अशा 2598 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 781 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1261 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 14 हजार 865 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 710 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.